मसाल्याचा मसला भाग ९ - वेलदोडा


नमस्कार मंडळी मी तुमच्या रोजच्या मिसळण्याच्या डब्ब्यात नसतो पण तुम्ही जो वर्षभराचा गरम मसाला करून ठेवता त्यात मी वेलची आणि मोठी वेलची अगदी आवर्जून उपस्थित असतो. शिवाय कोणत्याही गोड पदार्थात मी आवर्जून घातला जातोच. पाहूया माझी माहिती, स्वयंपाकातील आणि तुमच्या आयुष्यातील माझे महत्व. 

भारतात उगवणारी हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिच्या फळास वेलची, वेलदोडा, विलायची वेलदोडा, इलायची किंवा एला असेही म्हणतात वेलदोडा हा मसाल्याचा एक प्रकार आहे. ह्याचा वास खूप सुंदर असतो. वेलदोडा साधारणपणे गोड खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. विड्याच्या पानातही वेलदोडा टाकतात. याशिवाय मसालेभात, पुलाव, बिर्याणी यांत वेलदोड्याचा बडी इलायचीनामक प्रकार वापरला जातो.

वनस्पती मूळची भारतातली आहे. सुमारे आठव्या शतकाच्या आसपास वेलदोड्याचा शोध लागला असावा असा एक मतप्रवाह आहे. प्रामुख्याने भारतात व श्रीलंकेत वेलचीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. नेपाळ, ग्वाटेमाला, मेक्सिको, थायलंड व मध्य अमेरिकेतही या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

भारतात फार पूर्वीपासून एला नावाने वेलदोड्याचा वापर केलेला आढळतो. भ्रम उत्पन्न करण्यास वापरलेल्या काढ्यात वेलदोड्याचा उपयोग कौटिलीय अर्थशास्त्रात नमूद केला आहे. संस्कृत काव्यग्रंथांत वेलदोड्याचे उल्लेख आढळतात.

 वेलची हिं. छोटी इलाची गु. इलाची क. येलक्की सं. बहुला, एला, चंद्रबला इं. लेसर अथवा मलबार कार्‌डॅमम लॅ. इलेटॅरिया कार्‌डॅमोमम कुल-सिटॅमिनी, उपकुल-झिंझिबरेसी). वेलदोड्याला इंग्रजीत मसाल्याची राणी (क्वीन ऑफ स्पायसीस) असे नाव आहे व भारताला परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमांकाचे मसाल्याचे पीक आहे. ही बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) औषधीय वनस्पती असून हिचे मूलस्थान व मोठ्या प्रमाणावर लागवड दक्षिण भारतातील सदापर्णी जंगलात आहे. 

मोठा वेलदोडा किंवा मसाल्याचा वेलदोडा (ॲमोमम सुबुलेटम) या जातीची लागवड नेपाळ, बंगाल, सिक्कीम व आसाममध्ये पर्वतातील प्रवाहांच्या कडेने दलदलीच्या जागी करतात.

मोठ्या वेलदोड्याची फळे गर्द लाल-तपकिरी, गोलसर, २·५ सेंमी. लांब असून प्रत्येकात पुष्कळ बिया असतात, त्या साखरेसारख्या गोड दाट गराने एकत्र धरून ठेवलेल्या असतात. याच्या बियांचे वेलदोड्यासारखेच गुणधर्म असतात. त्यांचा मेवामिठाईत उपयोग करतात. उत्तेजक, कडू व रेचक औषधांना स्वाद आणण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. बियांपासून काढलेले तेल पाकणीच्या शोथावर (दाहयुक्त सुजेवर) लावतात.

वेलदोड्याची लागवड बियांपासून तयार केलेली रोपे लावून अथवा जुन्या पिकाच्या गड्‌डयातील ठोंब लावून करतात. रोपे लावून लागवडीची पद्धत सर्वसामान्यपणे वापरात आहे. परंतु वेलदोड्याचे फळ निसर्गात परपरागण [→ परागण] पद्धतीपासूनच तयार होत असल्यामुळे या पद्धतीत एकसारख्या गुणधर्मांची फळे मिळत नाहीत. दुसऱ्या म्हणजे शाकीय पद्धतीत चांगली जोमदार झाडे निवडून त्यांची ठोंबे लावल्यास चांगले उत्पन्न येते आणि रोपे लावून पीक मिळण्यास जेवढा कालावधी लागतो, त्यापेक्षा पुष्कळच कमी काळात पीक मिळते. ही पद्धत कमी खर्चाचीही आहे परंतु मोठ्या क्षेत्रावर लावण्यासाठी पुरेशी ठोंबे मिळणे कठीण जाते. शिवाय रोगट ठोंबांतून व्हायरसजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. शारीरिक अभिवृद्धीच्या पद्धतीने सतत लागवड केल्यास पिकाचा ऱ्हास होण्याचीही शक्यता असते.

नारळ सुपारी बागेत सिंचनाची सोय केलेली असल्याने त्यात वेलदोड्याचे भागते. या पिकासाठी जमीन मात्र उत्तम निच-याची असणे आवश्यक आहे. फुलांच्या तु-यांची ठेवण, फळांचा आकार आणि झाडाची वाढ यावरून मलबार, म्हैसूर, वझुक्का या मूळ तीन जाती प्रमाणित करण्यात आल्या आहेत. आता काही हायब्रीड जातीसुद्धा बाजारात आल्या आहेत. मलबार जातीच्या रोपांची लागवड कमी उंचीवरील प्रदेशात केली जाते. म्हैसूर जातीचे झाड दणकट असून या जातीची लागवड ९०० ते १२०० मीटर उंचीवरच्या प्रदेशात केली जाते. वझुक्का ही जात मलबार व म्हैसूर जातीच्या नैसर्गिक संकरातून निर्माण झाली आहे. केरळ राज्यात याची लागवड केली जाते. नारळी-सुपारीच्या बागेत मिश्रपीक म्हणून व सावलीसाठी सिल्व्हर ओकची लागवड करून वेलदोड्याची स्वतंत्र लागवड करता येते.

फळे काढणीचा प्रमुख हंगाम ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असतो. तु-यातील सर्व फळे एकावेळी काढणीसाठी तयार होत नाहीत. पूर्ण वाढलेली फळे रसरशीत, फिक्कट पिवळसर हिरवी व चकचकीत असतात. आतील बिया काळ्या असतात. फळे देठांसह अंगठय़ाच्या नखाने किंवा कात्रीने काढावी लागतात. वेलदोड्याची काढणी करताना काळजी न घेतल्यास फळावरून बारीक धागा निघतो व अशी फळे वाळवताना तडकतात. फळे अती पक्व झाल्यास वाळवताना तडकतात व कोवळी काढली तर सुरकुत्या पडतात. सर्वसाधारण बागेतून हेक्टरी शंभर ते १५० हेक्टर उत्पन्न मिळते. लागवडीनंतर १५ वर्षानंतर झाडांचे उत्पन्न कमी होण्यास सुरुवात होते. वेलदोडा उन्हात वाळवला जातो. स्वच्छ सूर्यप्रकाशात चार-पाच दिवसांत वेलदोडा वाळतो. वाळलेला वेलदोडा हवेतील आद्र्रता शोषून घेऊ नये म्हणून हवाबंद डब्यात साठवावा. उन्हात वाळवलेल्या वेलदोड्याचा रंग फिक्कट हिरवा होतो. वाळवताना काळजी न घेतल्यास दाणे ओलसर राहतात. त्यावर बुरशी वाढते.

वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत. वेलचीने गॅसची समस्या दूर होते. तसेच पचनासाठी वेलची मदत करते. पोट फुगलं किंवा जळजळ होत असल्यास वेलची यातून तुमची सुटका करते.

तीन वेलची, आल्याचा एक छोटा तुकडा, थोडीसी लवंग आणि धणे वाटून त्याची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने पचनाबाबत जी समस्या असेल ती दूर होते.

वेलचीमध्ये एक अॅंटी बॅक्टिरियल गुण असतो. तोंडातील किंवा श्वसनाबाबत दुर्गंधी असेल तर ती दूर होते. दररोज एक वेलची खा किंवा चहातून वेलचीचा आस्वाद घ्या.

अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.

वेलची खाल्याने चांगली भूक लागते. वेलची चावून खाल्ली तर अॅसिडीटी दूर होते शिवाय होणारी जळजळ थांबते.

खोखला, सर्दी, छातीत होणारा कफ दूर करण्यास वेलची मदत करते. सर्दी झाली असेल तर गरम पाण्यात वेलची तेलाचे काही थेंब टाकून ते नाकात टाकल्यास आराम मिळतो.

कशी वाटली माझी माहिती कॉमेंट मध्ये नक्कीच कळवा आता पुढच्या भागात आपण पाहू चक्री फुलाची माहिती.




No comments:

Post a Comment

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...